फोटोग्राफीची आवड आधीपासून होती. वाटायचं आपल्याकडे एक चांगला कॅमेरा असावा. त्यातून निसर्ग आणि विशेषतः समुद्र किनारे टिपता यावेत असा वाटायचं. शेवटी यावर्षी (2010) ठरवलं कॅमेरा घ्यायचा आणि शोध सुरु केला. हा घ्यावा... तो घ्यावा करत करत बाजाराच पालथा घातला. बायको शोधायला लागणार नाही एवढा वेळ लागला. तडजोड करावी लागली पण..... शेवटी nikon चा coolpix l 110 घेतला.